स्वातंत्र्य चळवळीत राजकीय जागरूकता निर्माण करणार्या, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणार्या पत्रकारितेपासून आजच्या २४*७ वृत्तपत्रिकेपर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक आहे. खिळे जुळवण्यापासून डिजिटल प्रिंटिंग, पेनच्या वापरातून संगणकाकडे, मुद्रित माध्यमांपासून टीव्ही चॅनेल्सपर्यंत आणि आता मोबाईलवर येणार्या ताज्या अपडेट्सपर्यंतचा हा बदल असाधारण आहे.
वार्तांकनासाठी लागणारे कागद, डायरी आणि पेन आता मागे पडले आहेत. चॅनेल्सच्या आगमनामुळे बूम व कॅमेऱ्यांची क्रेझ निर्माण झाली, पण मोबाईल क्रांतीमुळे या कॅमेऱ्यांची जागा मोबाईलने घेतली. आज प्रत्येकाला दृश्ये आणि घडामोडी थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची स्पर्धा आहे.
या स्पर्धात्मक युगात, News On Web टीम नाण्याच्या दोन्ही बाजूंबरोबरच ३६० अंशांप्रमाणे सर्व दृष्टिकोन सादर करण्यावर जोर देईल. सत्य, पारदर्शकता आणि समग्रता यांचा समावेश करून, आमचा हेतू अधिक माहितीपूर्ण आणि समृद्ध वार्तांकन प्रदान करणे आहे.
Mail id : newsonweb20@gmail.com
youtube : https://www.youtube.com/@NewsOnWeb