December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

pani-puri

एका जोडप्याची गोष्ट

पाणीपुरी म्हटल्यावर प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटतं. आंबट-गोड-तिखट अशा वेगवेगळ्या चवींची जिभेचे चोचले पुरवणारी ‘पाणीपुरी’ आजारपणाला कारणीभूत ठरते. या पदार्थाने अनेकांची पोटंही बिघडवली आहेत.

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये राहणाऱ्या प्रशांत कुलकर्णी यांचंच उदाहरण घ्या ना!.

प्रशांत यांचं पाणीपुरी प्रेम म्हणजे कहर होता. प्रशांत आणि त्यांची पत्नी आरती ऑफिसमधून घरी जाताना पाणीपुरी खाऊन घरी जायचे. एक वेळ आरती यांना‌ पाणीपुरीचा कंटाळा तरी यायचा. पण प्रशांत एक दिवसही चुकवायचे नाहीत. एक दिवस पाणीपुरीने प्रशांत याचं पोट बिघडलं. या पाणीपुरीप्रेमामुळे प्रशांत यांना तब्बल चार महिने अंथरुणातच काढावे लागले.

डॉक्टरांनी त्यांना यापुढे पाणीपुरी खाऊ नका, असा सल्ला दिला. प्रशांत यांनी रस्त्यावरची पाणीपुरी सोडली खरी. पण आपल्याला झालेला त्रास इतरांना होणार नाही, यासाठी काहीतरी करायला हवं, हा विचार त्यांच्या मनात आला. प्रत्येक खवय्याला स्वच्छ पाणीपुरी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी ठरवलं. इथूनच प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या नव्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

प्रशांत स्वतः एमबीए, तर पत्नी आरती एमटेक होत्या.

व्यवसायासाठी आरती यांनी प्रशांत यांना पाठिंबा दिला. पण आपल्या उच्च शिक्षित मुलाने पाणीपुरीचा स्टॉल टाकावा, ही संकल्पना घरच्यांना पटली नाही. मित्र आणि नातेवाईकांनी हा व्यावसाय चालणार नाही, तू दुसरे काहीतरी कर,’ असा सल्ला दिला. प्रशांत मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

कमी गुंतवणूकीत हा व्यवसाय सुरु ‌करण्यावर पती-पत्नीचं एकमत झालं.‌ प्रशांत यांनी या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली. तर आरती यांनी नोकरी सांभाळून मदत करण्याचं ठरविलं. ३० हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर दोघांनी ‘चटर-पटर’ ही‌ कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या अंतर्गत पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी ‘स्वच्छता’ आणि ‘पौष्टिकता’ हे दोन निकष ठेवून पाणीपुरीसाठी केवळ मिनरल पाणी वापरलं. तसेच दोन ते तीन स्नॅक्स ठेवले. हळूहळू त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला.‌

प्रशांत याचं फक्त पाणीपुरीचा व्यवसाय करणं उद्दिष्ट नव्हतं.‌ त्यांना‌ पाणीपुरीचा ब्रॅण्ड तयार करायचा होता.
त्यामुळे व्यवसाय विस्तारासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.
आरती यांनी ग्राहकांना एकाचप्रकारची पाणीपुरी दिली नाही, त्यांनी पाणीपुरीचे १००हून अधिक प्रकार शिकून घेतले.

पिझ्झा आणि बर्गर या मोठ्या ब्रॅण्डची चव प्रत्येक शहरात सारखीच असते. आरती यांनी पाणी-पुरी आणि चाटची चव सारखीच राहिल याची दक्षता घेतली. यासाठी प्रक्रियायुक्त उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलं. या अनोख्या संकल्पनेमुळे आणि उत्कृष्ट चवीमुळे अल्पावधीतच त्यांच्या स्टॉलला जबरदस्त लोकप्रियता मिळाली.

ज्या घरच्यांनी व्यवसायासाठी‌ विरोध केला. त्यांच्यापर्यंत या‌ स्टॉलची ख्याती पोहोचली होती.‌ आपला राग बाजूला ठेवून तेही दोघांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. प्रशांत आणि आरती यांना‌ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. माऊथ टू माऊथ पब्लिसिटीद्वारे त्यांचा व्यवसाय वाढत होता.

राजकोटमधून एका इसमाने फ्रॅन्चायसीचा प्रस्ताव ठेवला.‌‌ दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आज आरती आणि प्रशांत यांच्या चटर-पटर ब्रॅण्डद्वारे ग्राहकांना

पाणीपुरीचे १०० प्रकार दिले जातात. विशेष बाब म्हणजे ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌हॉवर्ड‌ विद्यापीठाने त्यांच्या पाणीपुरी ब्रॅण्डवर रिसर्च केला आहे. इंदौरमधून सुरु झालेला हा व्यवसाय भारतातल्या अनेक शहरांमध्ये पोहोचला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी समान चव आणि व्यवसायाचे निकष मात्र तेच ठेवले आहेत. ‘

पाणीपुरीला प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रशांत यांनी देशी‌ बर्गर ठेवायला सुरुवात केली. ‘बॉक्स-ओ-बर्गर’ नावाने ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌हा ब्रँड फेमस झाला आहे. तसेच अंड्याचे १०० प्रकारचे पदार्थ ठेवायला सुरुवात केली. गेल्या वर्षी कोरोनामुळे देशभरात लागलेल्या लॉकडाऊनचा फटका प्रशांत यांच्या व्यवसायाला‌ बसला होता. त्यावेळी त्यांनी ‘क्लाऊड किचन’च्या अंतर्गत साऊथ, नॉर्थ इंडियन या प्रकारचे पदार्थ लॉन्च केले.

आज प्रशांत यांचे हे सर्व पदार्थ मिळून देशात तीनशेहून अधिक आउटलेट सुरू आहेत आणि तीन हजारांहून अधिक जणांना रोजगार दिला जात आहे. ‘चटर-पटर ची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यांच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌सर्व‌ डिशेस उत्कृष्ट असतात. तरी चटरपटरची ‘चाटीज्जा‌’ आणि ‘गपागप’ डिश अवश्य घ्यायला हवी,’ असं‌एक ग्राहक सांगतो.

प्रशांत आपल्या व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहेत. दुबई आणि नेपाळ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌इथे आउटलेट सुरू करण्याची योजना आहे. तसेच फूड बिझनेस करणाऱ्या नवीन उद्योजकांसाठी एक प्लॅटफॉर्म उभारणार आहे.