८०० रिक्षांची तपासणी तर ८५ रिक्षांवर दंडात्मक कारवा
कल्याण : वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या व जास्तीचे भाडे आकरणाऱ्या रिक्षा चालकांवर आज कल्याण वाहतूक पोलीस व आरटीओ कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आज सकाळपासून कल्याण शहर वाहतूक पोलीस व कल्याण आरटीओच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या, जास्तिचे भाडे आकरणाऱ्या अशा मुजोर रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी सुमारे ८०० रिक्षांची तपासणी करण्यात आली त्यात आरटीओ मार्फत ४१ आणि वाहतूक शाखेमार्फत ४४ अशा एकूण ८५ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. इथून पुढे ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून रिक्षा चालकांनी नियमाचे पालन करावे असा आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं.
आज सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत वाहतूक उपशाखा कल्याण व आरटीओ कल्याण यांनी संयुक्तपणे कल्याण रेल्वे स्टेशन, दीपक हॉटेल, एसटी स्टँड, साधना हॉटेल या परिसरात सुमारे ८०० ते एक हजार रिक्षांची तपासणी करून विदाउट बॅच, लायसन्स, खाकी / सफेद गणवेश परिधान न करणे, वाहनाची नोंदणी, इन्शुरन्स, फिटनेस, परमिट इतर कागदपत्रे याची पडताळणी करून वाहतूक उप शाखा कल्याण मार्फत ४४ व आरटीओ कल्याण मार्फत ४१ असे एकूण ८५ कसूरदार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच कल्याण वाहतुक उपविभाग यांचेकडून सर्व रिक्षा चालक यांना मोटर वाहन कायद्यात झालेल्या सुधारणा व दंडात्मक रक्कम वाढ बाबत माहिती देऊन जनजागृती करुन कायद्याने दिलेले नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले असल्याची माहिती कल्याण वाहतूक उपशाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. यावेळी आरटीओ अधिकारी रमेश कल्लूरकर यांच्यासह त्यांचे सहकारी देखील कारवाईत सहभागी झाले होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर