कल्याण : गेली अनेक वर्षे मराठी भारती संघटना ही दादर स्थानकाचे नामांतर व्हावे यासाठी लढत आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून ही सरकारने अजूनपर्यंत याबाबत कोणतेच पाऊल उचलले नाही. हे सरकार जातीयवादी असल्यामुळे याबद्दल कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप संघटनेच्या राज्यध्यक्षा ऍड. पूजा बडेकर यांनी केला आहे.
अनेक स्थानकांना त्यांच्या एतोहासिक वारसा पाहता त्या ठिकाणचे नाव देण्यात आले, त्यात प्रभादेवी, राम मंदिर यांसारखे उदाहरण आत्ताचे आहेत. यांचे नाव बदलले जाऊ शकते तर दादर स्थानकाचे नामांतर करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय सरकारला असा सवाल कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी विचारला आहे. दादर या शब्दाला कोणताच अर्थ नसून दादर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. त्यांचे निवासस्थान पासून ते चैत्यभूमी पर्यंत सर्वच स्थळ येथे आहेत त्यामुळे दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेच गेले पाहिजे असे कार्यवाह अनिल हाटे यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चळवळीचे केंद्रबिंदू आहेत, अनेक चळवळ, संघटना त्यांनी स्थापन केल्या तसेच दादर हे देखील चळवळीचे एक केंद्र आहे. आज अनेक आंदोलने, संघर्ष दादरमध्ये होतात. दादर ला बाबासाहेबांच्या विचारांचा, चळवळींचा वारसा आहे. त्यामुळे दादर स्थानकाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस झालेच पाहिजे असे उपाध्यक्ष आशिष गायकवाड यांनी म्हटले असून गेली अनेक वर्षे संघटना मागणी करत असतानाही सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे असे मत संघटक राकेश सुतार यांनी मांडले आहे.
एवढी वर्षे सरकारला अनेक प्रकारे पत्रव्यवहार करूनही यावर एकही पाऊल उचलले गेले नाही पण यापुढे जर लवकरात लवकर सरकारने याबद्दल पाऊल उचलले नाही तर मराठी भारती संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा संघटनेच्या सचिव सोनल सावंत यांनी दिला आहे.
Attachments area
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर