December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ciber-security

तांत्रिक साक्षरतेसाठी सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

कल्याण : मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय, शहाड (प.) यांच्या अर्थशास्त्र विभाग व आय. क्यू.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चला तांत्रिक साक्षर होऊया या थीम अंतर्गत सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. तांत्रिक युगात विद्यार्थ्यांनी डिजिटल वर्ल्ड तसेच सोशल मीडिया मधील समस्या आणि फसवणुकीबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांना या विषयी जागरूक करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर प्रशिक्षण आणि सेवाचे संचालक व मुंबई सायबर लॅबचे माजी प्रकल्प व्यवस्थापक धर्मेंद्र नलावडे व त्यांचे सहकारी अ‍ॅड. श्वेता बाबर उपस्थित होत्या. धर्मेंद्र नलावडे यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शन करता करता फसवणुकीची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली.

या कार्यक्रमात शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके, प्रभारी प्राचार्या प्रा. कोमल चंदनशिवे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. अदिती पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सहा. प्रा. निलेश कुशवाहा व इतर प्राध्यापकांनी पार पडली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी एफ.वाय.बी.कॉम. ची विद्यार्थिनी कुमारी कोमल मेटकरी यांनी पूर्ण केली. कार्यक्रमात ११० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. तसेच विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकाकडून आपल्या प्रश्नांचं उत्तर ही जाणून घेतली.