December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

karate-team

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कल्याणचे खेळाडू चमकले

कल्याण : पुणे चिखली येथील विश्वा स्पोर्ट्स अँकॅडमी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली यामध्ये प्रामुख्याने नाशिक, सांगली, बारामती, पुणे संगमनेर, सातारा, सोलापूर , कल्याण व ठाणे या जिल्ह्यातून उत्तमोत्तम खेळाडू सहभागी होते. या स्पर्धेत कल्याणच्या मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या क्लबच्या खेळाडूंनी आपले कसब पणाला लावत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावत खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावले.

कल्याण मधील चेतना साळुंके, स्वरा शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. तर गायत्री कुरकुटे, द्विती थळे, हिमांशू खंडारे, कृष्णा गुप्ता या खेळाडूंनी रौप्यपदक तर आँचल गुप्ता, सिद्धी काकड, अंजली गुप्ता, अर्णव जाधव, समर्थ कुरकुटे, निरज बोरोले, नैतिक राऊत व गौरवी तारी या खेळाडूंनी कांस्यपदके पटकावले. क्लब च्या खेळाडूंना सेन्साई महेश चिखलकर सेकंड डन ब्लॅक बेल्ट यांचे प्रशिक्षण लाभले. तर शिहान देसले यांचे मार्गदर्शन मिळाले. विजिते खेळाडूंचे कल्याण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे