December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Titwala : ३७ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पकडण्यात कल्याण तालुका पोलिसांना यश

टिटवाळा : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कल्याण तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

सोहेल शब्बीर दिवाकर याचे वय ३७ आहे आणि गुन्हे त्यावर दाखल आहेत. अत्यंत किचकट आणि कोणतेही सबळ पुरावे नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून गुन्हा उघडकीस आणण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.

सोहेल हा आरोपी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करून त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या आरोपीकडून वाशिंद, भिवंडी परिसरातील चोरी केलेल्या ६ मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून संबंधित पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून आरोपी अजून किती गुन्ह्यात सहभागी आहे याची माहिती घेण्यात येत आहे. सोहेलवर ३७ गुन्हे दाखल असून त्याचा कल्याण तालुका पोलीस स्टेशन व इतर पो.स्टे.कडील नोंदीवरून शब्बीरवर मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी विजय सुर्वे, पो.ना. दर्शन सावळे, नितीन विशे, पो.शि. योगेश वाघेरे या पथकाने ही कामगिरी केली.