December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ganesh vidya

गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून केले स्वागत

कल्याण : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होता असताना आजपासून केडीएमसी क्षेत्रातील १ली ते इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना शाळेत कोरोनासंबंधित शासकीय नियमावलीनुसार प्रवेशउत्सव साजरे होत असताना कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा १ डिसेंबर रोजी सुरू होणार होती. परंतु पुन्हा ओमिक्रोन यामुळे शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असे घोषित करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १६ डिसेंबर म्हणजेच आज सुरू करण्यात येतील असे केडीएमसी प्रशासनाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करून सर्व शाळा सुरू होत आहेत. कल्याण पूर्वेकडील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिर या शाळेतील मुलांना शिक्षकांनी औक्षण करून त्यांचे तोंड गोड केले. प्रत्येक विद्यार्थ्यास भेटवस्तूही देण्यात आली.

मुलांच्या प्रवेश उत्सवासाठी सगळी शाळा स्वच्छ आणि सॅनिटाइझ करून शिवाय फुले, फुगे,व रांगोळी यांनी शाळा सजवून गाण्याच्या सुरात ढोल-ताशांच्या गजरात अतिशय भारावलेल्या व आनंदी वातावरणात पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाचा सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांनी दिली. तसेच यासाठी नागरिक सेवा मंडळाचे पदाधिकारी, तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले