कल्याण : इकोफ्रेन्डली सांताक्लॉज फेस शाडूच्या मातीपासून बनविण्याचे धडे स्केचो ॲक्टिव्हिट सेंटर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मानवली शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात येणार आहे.
आपला सांताक्लॉज कसा पर्यावरणपूरक असेल याचाही आपण विचार करणे गरजेचे आहे. कारण प्लास्टिकपासून बनवलेल्या मूर्तीपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. व्यापक सामाजिक जाणिवेतून हे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक शाडू मातीचा सांताक्लॉज बनवून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
कल्याण ग्रामीणमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मानिवली आणि कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अॅक्टीवीटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून “इकोफ्रेंडली सांताक्लॉज फेस मेकिंग” कार्यशाळेचे आयोजन मंगळवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मानवली येथे करण्यात येणार आहे. प्रदूषण विरहित व नैसर्गिक विसर्जनाची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १६२ बच्चेमंडळींना स्वतःच्या हातांनी इकोफ्रेंडली सांताक्लॉज फेस साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र या कार्यशाळेत शिकवले जाणार आहे.
जास्तीत जास्ती मुलांनी ह्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली यांनी केले आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण