December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला दुग्धाभिषेक

महाराजांचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही – राष्ट्रवादीचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला दुग्धाभिषेक

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार कर्नाटकमध्ये घडला होता. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी, शिवसेनेकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात येत आहे. कल्याणमध्ये देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.

       यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटक मध्ये आमच्या आराध्य दैवताची विटंबना केली त्याचा निषेध करतो. भाजपचा मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात भाजपने विष पेरण्याचे काम केले. या विषवल्लीचा निषेध करतो. महाराजांचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी सुधीर पाटील यांनी दिला. कर्नाटक येथील घटनेचा निषेध करताना त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सारख्या पक्षाला धडा शिकवण्याची वेळ आली असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयी केलेले विधान हे एक व्यक्तीचे नसून प्रवृत्तीचा आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी शिवप्रेमी जनता याबाबत या विषवल्लीला नक्कीच धडा शिकवून त्यांची जागा दाखवतील असा आम्हाला विश्वास असल्याचेही सुधीर पाटील यांनी सांगितले.