December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Congress OBC विभागाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

कल्याण : एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना कल्याणमध्ये हाच ओबीसी आरक्षणाचा लढा मजबूत करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांची जिल्हा कमिटी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष जयदीप सानप यांनी हि कार्यकारणी जाहीर केली. कल्याणमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश मुथा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष लखपती राजपूत, माजी नगरसेवक ओमप्रकाश पांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

       यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आगामी काळात कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस पक्ष बळकट करत ओबीसी आरक्षणसाठी संघर्ष करू. जो पर्यंत ओबीसी आरक्षण मान्य होत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नये असे जाहीर करण्यात आले आहे ती भूमिका कायम ठेवणार असून प्रांतअध्यक्ष नाना पटोले, ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू असे यावेळी जयदीप सानप यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली शहर जिल्हा ओबीसी विभागाच्या कार्यकारणीमध्ये एकूण ३८ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजा जाधव, कल्याण पूर्व भालचंद्र बर्वे, डोंबिवली शहर निवृत्ती जोशी, डोंबिवली ग्रामीण सूर्यकांत मंडपे, संघटक रीना खांडेकर, हाफीज कुरेशी, नितीन चौधरी, दशरथ नाईक, सचिव यादव माणिक सानप, विनोद शिंपी, विद्या चौहान, सतीश गुप्ता, सरचिटणीस भीमराव राठोड, मुन्ना यादव, रियाज सय्यद, अनिल पवार, उपाध्यक्ष प्रियंका बांगर, मदन जयराज, हरिश्चंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख कोणार्क देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा सदस्य रामेश्वर पवार, जावेद शेख, शफीक शेख, वैशाली शिंपी, अंकित आहेर, रॉकी राजपूत, सुमित जाधव, अय्यर, रोहन अग्रवाल, संदीप बिमल, फयाज मुल्ला, राजेश शेट्टी आदी उपस्थित होते.