कल्याण : अलीहसन जाफरी (२२, रा.आंबिवली) या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
सराईत गुन्हेगार असलेल्या अलीहसनचा चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीमध्ये हातखंडा आहे. महागड्या दुचाकी चोरून त्यावरून अलीहसन सोनसाखळ्या चोरायचा. दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.
कल्याण पूर्वेतील परिसरात चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली आणि या चोरट्यांचा शोध सुरु केला. खबऱ्यांमार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अलीहसनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटारसायकल, तीन सोनसाखळ्या असा 4 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे आणि मुंबई या ठिकाणीदेखील त्याने चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील यांनी दिली
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर