
कल्याण : भारताचे तिन्ही दलाचे पहिले प्रमुख बिपिन रावत हे काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात शहिद झाले होते. या अपघाताने संपूर्ण देश हळहळला होता. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळखा असलेल्या “वजीर”वरून महाराष्ट्राच्यावतीने बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शहापूर तालुक्यातील वशिंद गावात वजीर हा सुळका आहे. सुमारे २८० फूट उंचावर असलेला हा सुळखा ९० अंश कोनात उभा राहिलेला आहे. या मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्यावतीने भूषण पवार, पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, प्रदीप घरत, नितेश पाटील, अभिषेक गोरे, सुनील कणसे हे सहभागी झाले होते. त्याचसोबत या मोहिमेत वयाची ५० पार केलेले गिर्यारोहक सुद्धा सहभागी झाले होते.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम