वाहतुकीच्या समस्येचा आराखडा तयार
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीसह शहरातील अनेक ट्राफिक जंक्शनवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक जंक्शन तयार करण्याचे नियोजन सुरु असून स्मार्ट सिटी प्रकल्पातून तयार होणारा सॅटीस प्रकल्प देशातील उल्लेखनीय प्रकल्प असून दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत अनेक वर्षांनी सुरु झालेली सिग्नल यंत्रणा इतर शहराच्या मानाने खूपच प्रगत आणि उल्लेखनीय आहे. शहरातील वाहतुकीच्या समस्या अनेक असून त्याला सर्वच घटक जबाबदार आहेत. सर्वांनी ही कोंडी फोडण्याची जबाबदारी आपली आहे याचे भान ठेऊन काम केले तर शहराचा सुनियोजित पद्धतीने विकास करणे अशक्य नसल्याचे मत केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी मांडले. कल्याण डोंबिवली प्रिंट मिडिया असोसिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाहतूक कोंडीवर उपाययोजना’ या विषयावर ते बोलत होते.
या परिसंवादात आयुक्तांसमवेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण, परिवहन महाव्यवस्थापक डॉ दीपक सावंत, शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, नगररचनाकार दिशा सावंत, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, उमेश गित्ते, पालिका सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, वास्तूविशारद राजीव तायशेटे, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी मनोहर देशमुख, सचिन गवळी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी विजय भोसले, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी शेखर जोशी, संतोष नवले, शारदा ओव्हळ यासह पालिकेचे अधिकारी, नागरिक आणि रिक्षा चालक उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर