December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सेंच्युरी रेयॉन कंपनीद्वारा किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबिर

कल्याण : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी अंतर्गत रायते विभाग हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठी भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिर पार पडले. इयत्ता ८वी ते १०वी च्या सुमारे २५० मुलींना किशोर वयात शरिरात व स्वभावात होणारे अंतर्गत बदल, मासिक पाळीवरील समस्या व गैरसमज, मनाची अस्थिरता व त्याची कारणे, समतोल आहार, निद्रा व पुरेसा व्यायाम इत्यादी विषयावर मौखिक व चलचित्र द्वारा तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

मुलींना मौखिक आणि चलचित्राद्वारे मार्गदर्शन करताना तज्ञ

ग्रामिण व दुर्गम भागात आजही किशोरवयीन मुलींच्या मनात आरोग्य विषयी खूप समस्या असतात. या समस्या घरात निर्भिडपणे सांगत सुद्धा नाहीत शिवाय या समस्यांवर वेळीच मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही. त्यामुळे अनेक गैरसमज आणि आजारांना या मुलींना सामोरे जावे लागते. म्हणून हे शिबिर घेण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ महिला आधिकारी शिल्पा शहा यांनी शिबिर उद्घाटनप्रसंगी सांगितले. सर्व उपस्थित मुलींना भेट स्वरूप सॅनेटरी नॅपकिन संच, मारक, सेनिटायजर व शेंगदाणा चिक्की पाकिटे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी रायते जिल्हापरिषद सदस्य महेंद्र जाधव, मुख्याध्यापक सी.एस.पाटील व इतर शिक्षक वर्ग व कर्मचारी इत्यादी उपस्थित असल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी सांगितले.