कल्याण : महाराष्ट्र लंगडी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा लंगडी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली लंगडी असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय पंच परीक्षा विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानचे सिद्धार्थ विद्या मंदिर, कल्याण पूर्व या ठिकाणी संपन्न झाली.
या पंच परीक्षेत कल्याण डोंबिवलीतील विविध शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे सचिव चेतन पागावाड उपस्थित होते. त्यांनी लंगडी खेळाचे नियम, मैदान याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सहसचिव सुभाष गायकवाड यांनी मैदानावर प्रत्यक्ष खेळ कसा खेळला जातो हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अविनाश नलावडे, खजिनदार अशोक काठे, संतोष कदम, ज्ञानेश्वर मगरे हे पदाधिकारी उपस्थित होते.
पंच परीक्षा यशस्वी होण्यासाठी कल्याण डोंबिवली लंगडी असो.चे अध्यक्ष संजय मोरे आणि सिध्दार्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या शिबिरासाठी सुप्रिया नायकर, राजू घुले, मिलिंद धंबा, निता जाधव, विजेता रहाटे, जिजाभाऊ शिंदे, दशरथ आचरेकर, अजय गांगुर्डे, सचिन भोई, शिवाजी इंगोले, तुकाराम खाटेघरे, गौरव पाटील हे उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रविण खाडे यांनी केले तर आभार अशोक काठे यांनी मानले. उपस्थितांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण