स्पर्धेत आदिवासी संघाचा देखील सहभाग
कल्याण : युवकांना खेळण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांना संधी उपलब्ध व्हावी व त्यांच्यामधून अनेक खेळाडू निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ”होपमिरर फाउंडेशन” संस्थेच्या वतीने धानसर येथे ”होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१” चे आयोजन करण्यात आले होते. होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ चा किरवली संघ प्रथम विजेता ठरला तर, पिसार्वे संघ उपविजेता ठरला.

होपमिरर फाउंडेशन ही नवी-मुंबईतील संस्था आहे. जी गरिबी निर्मूलन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि विविध विषयांवर काम करते. होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विशेष म्हणजे सर्व संघांसाठी विनामूल्य प्रवेश होते. क्रीडा क्षेत्रातील ग्रामीण भागाचा विकास आणि उन्नती हा संस्थेचा उद्देश आहे. होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफीचे उद्घाटन अरुण भगत, विक्रांत पाटील, प्रल्हाद केणी याच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत आंबेवाडी, वांगणी आदिवासी संघासह जवळपासच्या १० हून अधिक स्थानिक संघानी सहभाग घेतला होता. होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये गुरु म्हात्रे, आमिर सय्यद, ताहीर पटेल, नंदकिशोर म्हात्रे, सचिन पाटील, आयुब शेख, प्रथमेश पाटील तर आदी उपस्थित होते. होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ यशस्वी करण्यासाठी होपमिरर फाउंडेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
ग्रामीण भागात विशेषत खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी. त्यांचे प्रोत्साहन वाढावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ सर्व संघांसाठी खुले आणि विनामूल्य प्रवेश दिले असल्याचे होपमिरर फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमझान शेख यांनी सांगितले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू