December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अक्षयकुमार प्रजापतीची रौप्य कामगिरी

कल्याण : तूर्कीची राजधानी इस्तंबूल येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये कल्याणचा सुपुत्र अक्षयकुमार प्रजापती याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली. ६६ किलो वजनी (ज्युनिअर) गटात ५२९.५ किलो वजन उचलत अक्षयने ही कामगिरी पार पाडली. एकूण दोन पदके जिंकून कल्याणच्या या विराने भारताचा तिरंगा तुर्की येथे मानामध्ये मिरविला.

भारताचा तिरंगा अक्षयकुमारने तुर्कीत मिरवला

प्रजापती हा शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या यशामुळे सर्व विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याचे मत शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांनी व्यक्त केले. अध्यक्ष जयंती हरिया, संचालक एस.एस शिवशरण व प्रभारी प्राचार्या प्रा. कोमल चंदनशिवे यांनी अक्षयचे अभिनंदन केले आहे.