December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

१५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी KDMC सज्ज

कल्याण : 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत केले जाणार आहे. यासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील.

लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल, ही ऑनलाईन सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधा सुद्धा मुलांसाठी उपलब्ध आहे. यावेळी येताना लाभार्थ्यांनी स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगणे आवश्यक आहे.

  • महानगरपालिकेच्या
  • 1. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पश्चिम
  • 2. शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम
  • 3. सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व
  • 4. शक्तिधाम कोळसेवाडी, कल्याण पूर्व
  • 5. आर्ट गॅलरी, कल्याण पश्चिम
  • 6. मोहने लसीकरण केंद्र विराट क्लासिक, आंबिवली

या लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत १६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) उपलब्ध राहणार आहे. लसीकरणास येताना जन्मदाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधारकार्ड जवळ बाळगणे अनिवार्य राहील. 
महापालिकेच्या लसीकरण केंद्र व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील कोविड लसीकरणाची सुविधा (कोवॅक्सिन) तेथील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.