December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याणच्या गिर्यारोहकांनी दिला “पर्यावरण वाचवा” संदेश

हजार फुटावरील जीवधन-वानरलिंगी व्हॅली केली क्रॉसिंग

कल्याण : नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे २०० फूट लांब असलेला वानरलिंगी सुळखा या दोन्ही कड्यांच्या सुमारे एक हजार फूट उंचावरुन लटकून झिप्लायनिंगच्या मदतीने कल्याणचे गिर्यारोहक भूषण पवार आणि नितेश पाटील यांनी पर्यावरण वाचवा संदर्भातचा सामाजिक संदेश दिला.

कल्याणच्या गिर्यारोहकांनी दिला सामाजिक संदेश

नाणेघाटाच्या पायथ्यापासून ट्रेकला सुरुवात होताच सुमारे एक तासाची पायपीट केल्यावर जीवधन किल्ल्याचे वैभव डोळ्यासमोर येते. त्याचसोबत किल्ल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर दिसतो तो ४५० फुटांचा वानरलिंगी सुळखा. जीवधन किल्ल्याचा माथा गाठण्यासाठीची सुरुवातचं ही घनदाट जंगलातून होतं असल्याने विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांची भीती ही असतेच. ह्या सर्व गोष्टींवर मात करून कल्याणच्या या दोन्ही गिर्यारोहकांनी एक सामाजिक संदेश दिला.
व्हॅली क्रॉसिंग म्हणजे दोन गडांच्यामधील अंतर हे दोरीला लटकून पूर्ण करणे. जीवधन आणि वानरलिंगीमधील अंतर हे सुमारे २०० फूट उंच असून जमिनीपासून एक हजार फूट उंच आहे. जरा चूक झाली तर सरळ दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जोखमीच्या मोहिमेत सुरक्षा प्रथम प्राधान्य ठेवलेले असते. झिप्लायनिंग करून वानरलिंगी सुळख्यावर पोहचताच कल्याणच्या या दोन्ही गिर्यारोहकांनी पर्यावरण वाचवा म्हणून एक सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम केला. त्यांना विशेष साथ लाभली ती एसएल ऍडव्हेंचरच्या लहू उगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची.
राज्यात ठिकठिकाणी असलेला गड त्यांच्यासोबत मानवाने आपल्या स्वार्थासाठी उत्खनन करून गडाचं पावित्र्य धोक्यात आणले आहे. पर्यावरण धोक्यात घालून आपणच आपले भविष्य धोक्यात आणतोय असे भूषण पवार यांनी सांगितले. दिसायला जरी बारीक असली तरीही या रोपवर पूर्ण विश्वास असल्याने, पडण्याची भीती अजिबात वाटतं नाही असे मत नितेश पाटील यांनी व्यक्त केले.