December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

बालिका दिनी kdmc च्या वतीने १० विद्यार्थिनींना हॅपीनेस किट्सचे वाटप

कल्याण : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन हा सर्वत्र “बालिका दिन” म्हणूनही साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी KDMC शाळांमधील १० विद्यार्थिनींना केडीएमसी शिक्षण मंडळ व अक्षयपात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा अंतर्भाव असलेल्या हॅपीनेस किट्सचे वाटप केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर अधिकारी वर्ग व शिक्षण विभागाचे उपायुक्त उपस्थित होते.

केडीएमसी मुख्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त केडीएमसी मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, विनय कुलकर्णी, अनंत कदम, वैदयकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, सचिव संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

प्लास्टिक निर्मूलनाची घेतली शपथ

महापालिकेच्या घनकचरा विभागमार्फत ०३ ते ०९ जानेवारी हा सप्ताह प्लास्टिक निर्मूलन म्हणून साजरा केला जात असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.

क प्रभाग कार्यालयात केले अभिवादन

कल्याण पूर्वेतील पालिकेच्या जे प्रभाग कार्यालयात अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या तमाम महिला वर्गाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणा-या अन चूल-मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांना प्रवाहात आणणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त रामदास कोकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्लास्टिक निर्मूलनची शपथ सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, प्रमाग क्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने शपथ घेतली. यात प्रभागातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.