April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

Kalyan Crime : कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

मायलेकीला कोळसेवाडी पोलिसांनी केली अटक

कल्याण

मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरून झालेल्या वादातून पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून मुलगी आणि पत्नीने हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास पुर्वेतील नाना पावशे चौक परिसरात घडली. प्रकाश राजाराम बोरसे (वय ५५) असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. हत्येप्रकरणी त्यांची पत्नी ज्योती (वय ४५) आणि मुलगी भाग्यश्री पवार (२७) या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

मृतदेहाशेजारी मायलेकी बसून होत्या चार तास

  1. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
  2. दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडून पोलीस घरात शिरले.
  3. हत्या केल्यानंतर मृतदेहाशेजारी मायलेकी चार तास बसून होत्या.
  4. रात्री ८ वाजता घडलेली घटना रात्री १२ वाजता उघडकीस आली.

बोरसे यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले आहे. परंतु, तिचे नव-यासोबत पटत नसल्याने ती आई वडीलांकडेच राहत होती. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बोरसे पूर्वेतील राहत्या घरी आले. मुलगी सासरी नांदत नाही यावरून घरात रात्री आठच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने बोरसे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात बोरसे हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

,