April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

कल्याण पूर्वेत KDMC ची माध्यमिक शाळा सुरु करण्याची कल्याण विकासिनीची मागणी

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण पूर्व विभागात महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा सुरू करण्याची मागणी कल्याण विकासिनी संस्थेच्या माध्यमातून ऍड. उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.  

कल्याण पूर्व विभागात, गरीब, मध्यम वर्गीय सर्वसामान्य नागरिकांची वस्त्ती मोठ्या प्रमाणावर आहे. चाळी झोपडपट्टी, जुन्या इमारतीमध्ये राहणारे चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या कोविड काळात व्यवसाय, धंदा न राहिल्याने व नोकरी नसल्याने आर्थिक बिकट परिस्थितीत लोक राहत आहेत. पूर्वेत मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना खाजगी शाळा आणि त्यांची फी परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून माध्यमिक शाळा, १० वी पर्यंत शाळा कल्याण पूर्व विभागात सुरू व्हावी. जेणे करून गरीब, कामगार कष्टकरी लोकांची मुलांना शाळा शिकण्याची व्यवस्था होईल आणि ते शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत अशी मागणी कल्याण विकासिनीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक ऍड. रसाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. या विषयाला लावून धरणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करू असेही त्यांनी सांगितले आहे.