December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाकुर्लीमध्ये रुक्ष भिंती होतायत बोलक्या

डोंबिवली

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या रुक्ष भिंतीना बोलके करण्याचे काम KDMC ने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे.

गृहसंकुलाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी केडीएमसी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांनी या निर्जीव भिंतींना बोलके करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासोबतच रस्त्यावरील दुभाजक यांची रंगरंगोटी, वृक्ष लागवड देखील करण्यात येत आहे.

ठाकुर्ली ९० फिट रोडला मुंबईच्या मरीन ड्राईव्हची उपमा देण्यात आली होती. नागरिकांसाठी ओपन जीम, सेल्फी पाॅईंन्ट येथे बनविण्यात आला होता. मात्र, कालांतराने त्याकडे झालेले दुर्लक्ष व रस्त्याच्या कामामुळे हे सौदर्य काहीसे बिघडले होते. आता पुन्हा या रस्त्याचे सौंदर्य खुलावण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांनी हाती घेतले आहे. त्यानुसार कचोरे परिसरात असलेल्या ५०० मीटर लांब भिंतीवर रंगकाम करण्यात येत आहे.

यासाठी शाळांतील चित्रकलेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व पुढे यावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

,