December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Dombivali Crime : घरात घुसून महिलेची हत्या

डोंबिवली

पूर्वेतील टिळकनगर चौकात असलेल्या आनंद शीला या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

विजया बाविस्कर (५८) या घरात एकट्याच राहत होत्या. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला घरी आली असता बाविस्कर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
बाविस्कर यांच्या हत्येची माहिती शेजाऱ्यांनी टिळक नगर पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. लवकरच हत्यारा हाती लागेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.