कल्याण
कल्याणच्या महेश पाटील यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ठाणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने ४१ वी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची ठाणे श्री २०२१–२२ हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत कल्याणमधील वाडेघर गावचे सुपुत्र महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा श्रीमान स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळविले. औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. २३ जानेवारी रोजी ही राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे होणार असून या स्पर्धेसाठी महेश पाटील जोरदार तयारी करत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल कल्याणमधील अनेक मान्यवर व्यक्तींकडून, वाडेघर ग्रामस्थ आणि खेळाडूंकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करून कल्याणचे नाव रोशन करण्याच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आणखी बातम्या
आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’
रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा २०२५
कल्याणात रोटरी क्लबचा ‘अमृत जल’ उपक्रम