विजया यांच्या हत्येचे गूढ उकलले
डोंबिवली
दागिन्यांच्या मोहापायीच विजया बाविस्कर (५८) यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हत्येप्रकरणी पोळी भाजी केंद्र चालविणाऱ्या सीमा खोपडे (४०) हिला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्वेतील आनंद शिला सोसायटीत राहणाऱ्या विजया बाविस्कर या महिलेची तिच्या रहात्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. घरकाम करणारी महिला घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव चुंबळे, प्रविण बाकले, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस उपनिरिक्षक ममता मुंजाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वणवे, पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमाळे, संदिप शिंगटे, कुलदीप मोरे आणि पोलिस अंमलदार अशी पाच वेगवेगळी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर