December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

प्रजासत्ताक दिनी केडीएमसी क्षेत्रात ५४ ठिकाणी लसीकरणाची सुविधा

कल्याण

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी KDMC क्षेत्रातील नागरिकांसाठी महापालिकेने ५४ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये ५ लसीकरण केंद्रावर वर्ष १५ ते १८ वयोगटांतील मुला/मुलींसाठी व ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोस तसेच बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली आहे.

फ्रंटलाईन वर्कर्स व हेल्थ केअर वर्कर्स यांच्यासाठी १४ लसीकरण  केंद्रावर पहिल्या व दुस-या डोसची तसेच बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ३५ लसीकरण केंद्रांवर वय १८ वर्षावरील नागरिकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात पहिल्या व दुस-या डोसची व २ ठिकाणी बुस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.