December 6, 2024

news on web

the news on web in leading news website

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या रोषणाईत उजळून निघाली कल्याणनगरी

कल्याण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला KDMC ने आगळे वेगळे नयनरम्य असे गिफ्ट कल्याण डोंबिवलीकरांसठी दिले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रेम ऑटोपर्यंतचा मार्ग तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील कायापालट अभियान सध्या कल्याण डोंबिवली परिसरात राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी आकर्षक चित्रे काढून रंगवणेसह आकर्षक विद्युत रोषणाईही केली जात आहे.

याच अभियानाचा एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील १२० पथदिव्यांवर तिरंग्याच्या थीमवर आधारीत आकर्षक अशी एलईडी रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलून निघाले आहे आहे. येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ओक टॉवर, पत्रीपूलसारख्या महत्वाच्या ठिकाणी रोषणाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये एक चांगला संदेश देण्यासाठी ही रोषणाई केल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.या समयी महापालिका सचिव संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व इतर अधिकारी उपस्थित होते.