December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कल्याण/डोंबिवली

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त केडीएमसी मुख्यालयात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या समयी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ध्वजारोहण करुन तिरंग्याला सलामी दिली.

या समारंभात आयुक्त यांच्या सुविद्य पत्नी डॉ. आरती विजय सूर्यवंशी, महापालिका शहर अभियंता सपना कोळी, उपायुक्त डॉ. सुधाकर जगताप, अर्चना दिवे, रामदास कोकरे, महापालिका सचिव संजय जाधव, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, इतर अधिकारी, माजी पदाधिकारी  व कर्मचारी वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे गेल्या २ वर्षात कोरोनाच्या काळात प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत उत्कृष्टरीत्या आपले काम सांभाळले आहे असेही  प्रशंसोद्गार  त्यांनी यावेळी काढले, यासमयी अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या कर्मचा-यांनी संचलन करून मानवंदना दिली. महापालिकेच्या १० प्रभागातील गुणवंत सफाई कामगारांना प्रशस्ती पत्र आणि भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक यांनी, प्लास्टिक बंदी व स्वच्छ प्रभाग कार्यवाहीची अंमलबजावणी  उत्तमरित्या बजावल्याने त्यांचाही प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी महापालिकेचे माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तद्नंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

सीएनजी घंटा गाड्यांचे लोकार्पण

सीएनजी घंटा गाड्यांचे लोकार्पण

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत, २५ सीएनजी (कल्याण विभागाकरीता १३ व डोंबिवली विभागाकरीता १२ ) घंटागाडयांचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचे हस्ते करुन त्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या. यामुळे पर्यावरणाचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.