कल्याण
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक प्राथमिक, माध्यमिक सम्राट अशोक इंग्लिश स्कूल सेंट वाय सी इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमा प्रसंगी डॉक्टर मित्र ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षांपासून डॉक्टर मित्र ट्रस्ट मार्फत निराधार मुले व निराधार वृद्धांची सेवा करत असलेले डॉक्टर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या भाषणात जाधव म्हणाले, संविधानाचा हक्क आणि संविधान अधिकाराचा वापर सर्वांनी करायला पाहिजे. संविधानामुळे आपले राष्ट्र एकसंघ आहे. आपला देश विविध जाती धर्मांनी नटलेला आहे. संविधानामुळे बंधुभाव न्यायाने आपण राहत आहोत. आपण सर्वांनी प्रजासत्ताक दिनी संविधानाचा गौरव केला पाहिजे.
शाळेतील एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करून तिरंगी ध्वजास सलामी दिली. सुवार्ता पवार या विद्यार्थीनीने भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले. यावेळी संविधान गौरव स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, डॉक्टर मित्र ट्रस्टच्या विश्वस्त सुरेखा जाधव, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावडे, पंकज दुबे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी व पालक कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी तर प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी व आभार सुजाता नलावडे यांनी व्यक्त केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर