कल्याण
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाडेघर गावामध्ये नवजीवन रँक पिक अरस संस्था कल्याण, यांच्यावतीने आधारवाडी कारागृहाच्या पाठीमागे कातकरी पाडा येथे महाराष्ट्र कोळी समाज कल्याण तालुका उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या कातकरी वाडीतील मुलांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. समाजसेवक तानाजी गायकर, श्री साई सेवा मंडल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त सागर पाटील, आजय औवसरे, देवेश भालेराव, आमन गुप्ता, दिव्यांशु पाटील यांच्यासह आदिवासी मित्र मंडळ व महीला मंडळ उपस्थित होते.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी