कल्याण
रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर (कल्याण पूर्व) तर्फे कोरोना काळात ज्या कुटुंबातील आई किंवा वडील मृत पावले आहेत, अशा अनाथ झालेल्या मुलांना रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर तर्फे ४ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेतर्फे ८ कुटुंबांना ही मदत देण्यात आली.
या कार्यक्रमास माजी नगरसेविका शीतल मंढारी, सुशीला माळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी चंद्रकांत देव, रोटरी सदस्य भुपेंद्र काळे, माजी अध्यक्ष आशिष वाणी, विजय भोसले, सिद्धेश देवळेकर, श्रीधर ठाकूर देसाई, राजू बोर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमाकांत चौधरी यांनी केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर