December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कचरा कुंडीमुक्त परिसर

कल्याण

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कायापालट स्वछता अभियान अंतर्गत व घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका व सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वेतील प्रसाद हॉटेल व संतोषी माता मंदिर परिसर येथील कचरा कुंडी बंद करून हा परिसर सुशोभित केला.

या ठिकाणी ‘जे’ प्रभागातील सहायक आयुक्त हेमा मुंबरकर, माजी नगरसेवक निलेश शिंदे, आरोग्य निरीक्षक दिघे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास माजी नगरसेविका शीतल मंढारी, सुशीला माळी, ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयचे सहाणे सर, शाखा प्रमुख सचिन राणे, भारत सटाळे आदी उपस्थित असल्याची माहिती सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांनी दिली.