December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

ठाणे वनविभागाची कामगिरी

कल्याण

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना ठाणे वनविभागाने अटक केली. रमेश तुकाराम वाळिंबे (रा. आल्यानी), बारकु गणपत हिलम, (रा. कळगाव), गणेश गुरुनाथ वाघ, (रा. कळगाव) अशी त्यांची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणारे आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे वनक्षेत्रपाल पडघा यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून रेंज स्टाफ वनपाल वनरक्षक पडघा यांच्या समवेत नाशिक मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोडजवळ मौजे कासने गाव हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी भेकर जातीचे पिल्लू अवैध विक्री व्यवहार करताना तिघांना जिवंत भेकरचे पिल्लासोबत पकडले. भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

| वनविभागाचे पथक

या कारवाईत वनपाल पडघा दिनेश माळी, वनपाल वडपा विलास निकम, वनपाल दिघाशी श्याम चतुरे, वनरक्षक सांगावं अजय राठोड, वनरक्षक पाच्छापूर अमित कुलकर्णी, वनरक्षक लोनाड जमीर इनामदार, कार्यालयीन लेखापाल पंकज भाऊसाहेब, महेंद्र भेरे कार्यालयीन कर्मचारी, वाहन चालक विकास उमतोल, संतोष गोडांबे, वनमजूर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त केल्या असल्याची माहिती वनपाल साहेबराव खरे यांनी दिली.