December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

पुणे

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली.

अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुण्यातील बी. जे. मेडिकल महाविद्यालयमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.

१९६९ साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता.