कल्याण
ऐतिहासिक कल्याण शहरातील राष्ट्रप्रेमी रामभाऊ कापसे यांनी आमदार-खासदार आणि राज्यपाल म्हणून केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या महान कार्यामुळे कल्याणचे नेतृत्व देश पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्य आणि देश पातळीवरील राजकारण करताना नेहमी देशाचा विकास करण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे जनसेवा व समाजसेवा केली आहे. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुभेदारवाडा कट्ट्याने प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला सुरू केली आहे. यंदा शनिवार, २९ जानेवारी ते सोमवार ३१ जानेवारी २०२२ दरम्यान या व्याख्यानमालेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात येत आहे.
पहिले पुष्प शनिवारी
पहिले पुष्प शनिवारी, २९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता गुंफले जाणार आहे. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच आमदार आशिष शेलार मार्गदर्शन करणार आहेत.
दुसरे पुष्प रविवारी
दुसरे पुष्प रविवारी, ३० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता होणार असून, त्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आपले विचार मांडतील.
तिसरे पुष्प सोमवारी
तिसरे पुष्प सोमवारी, ३१ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी गुंफणार आहेत.
हे तिन्ही कार्यक्रम सुभेदार वाडा हायस्कूल, गांधी चौक, कल्याण (प.) येथे होणार आहेत. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेले निर्बंध विचारात घेऊन फक्त निमंत्रितांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार आहे.
नागरिकांसाठी,
https://www.facebook.com/subhedarwadakatta/
या द्वारे या व्याख्यानमालेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती निमंत्रक डॉ. आनंद कापसे आणि सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे देण्यात आली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर