Power by The Web Cloud Media

‘शाब्बास… भले बहाद्दर… दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन

महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक

मुंबई

‘महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत… शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनिस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच एनसीसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले

महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान ध्वजाचा (प्राईम मिनिस्टर बॅनर) वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *