December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

चंदेरी गडावर इतिहासात पहिल्यांदा फडकला तिरंगा

सहयाद्री खोऱ्यातील कठीण श्रेणीत मोडणारा गड

बदलापूर

नुकताच भारत देशाने आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला. याचदिवशी सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या दुर्गसंवर्धनासाठी झटणाऱ्या मावळ्यांनी बदलापूर जवळील चंदेरी किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदा तिरंगा फडकवून एक विक्रम केला.

सहयाद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी नुसतंच ना केवळ गडावर तिरंगा फडकवला तर गडावरील साचलेला कचरा सुद्धा स्वच्छ केला. त्यामध्ये प्लास्टिक, दारूच्या बाटल्या गडावरून स्वच्छ करण्यात आल्या. चंदेरीगड बदलापूरला लागूनच असून गडाची उंची ही सुमारे ३ हजार फूट असल्याने सह्याद्रीच्या खोऱ्यातील कठीण श्रेणीत मोडणाऱ्या गडांपैकी एक आहे. या मोहिमेत बदलापुर, अंबरनाथ, पनवेल, मुंबई, ठाणे येथील ५० दूर्गसेवकांचा सहभाग लाभला. या मोहिमेचे नेतृत्व संदिप जाधव, सोमनाथ पांचाल आणि आदेश पाडेकर यांनी केले.