December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

kalyan Crime : म्हणून त्याने केला हवेत गोळीबार

MFC पोलिसांनी पिस्तूल तस्कराला केली अटक

गणेशकडून एक देशी पिस्तूल, एक देशी कट्टा यासह सहा जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत.

उमेश पाटील – सहायक पोलिस आयुक्त (कल्याण)

कल्याण

पिस्तुलाची चाचणी करण्यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्या गणेश राजवंशी (रा. घणसोली) याला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. गणेश हा पिस्तुल तस्कर असून तो पिस्तुल विकण्यासाठी कल्याणमध्ये आला होता.

कल्याणमध्ये एक व्यक्ती देशी पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो नेमका कुठे येणार आहे याची माहिती त्यांना नव्हती.

या आरोपीला पकडण्यासाठी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांनी दोन पथके तयार केली होती. याच दरम्यान काळा तलाव परिसरात असलेल्या एका टपरीसमोर एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले.

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांनी गणेशकडून एक देशी पिस्तुल आणि एक देशी कट्टा हस्तगत केला आहे.