December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kalyan Crime : बाप लेकाने नात्याला फासला कलंक

अल्पवयीन मुलीवर बापलेकाने केला लैंगिक अत्याचार

कल्याण

१६ वर्षीय पोटच्या मुलीवर सख्या बापासह भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी बापलेकाला अटक केली.

पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहायला आहे. पीडितेची आई ६ महिन्यापूर्वी उत्तरप्रदेशात गेली आहे. तर नराधम भावाची पत्नीही माहेरी गेली आहे. याचाच फायदा घेत पीडितेला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन २३ वर्षीय तिच्या नराधम भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर नराधम बापानेही अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ६ महिन्यापासून हे नराधम तिच्यावर अत्याचार करीत होते. दरम्यानच्या काळात पीडित मुलीने तिच्यावर घडलेला प्रसंग आईलाही सांगितला. त्यानंतर बापलेकाने तिला विवस्त्र करून घरातच बेदम मारहाण केली. दोघा नराधमांच्या वाढत्या अत्याचाराने भयभीत होऊन पिडीतेने परिसरात राहणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

त्यानंतर सामाजिक महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित मुलीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी दोघांवर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांना अटक केली.