काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधील घटना
कल्याण
मेल एक्सप्रेसमध्ये लूटपाट करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. मेलमध्ये प्रवाशांना लुटत असताना प्रवाशांनी सतर्कता दाखवत १०० नंबरवर फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या मेलमध्ये कार्यरत असलेल्या आरपीएफ जवानांनी या पाच जणांना ताब्यात घेत कल्याण जीआरपीच्या हवाली केले. धक्कादायक म्हणजे, पाच आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. न्यायालयाने चार आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वसई येथे राहणाऱ्या जया पिसे या महिला प्रवासी तिच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. सोलापूर येथून त्या या मेलमध्ये बसल्या होत्या. २७ जानेवारी रोजी गाडी कर्जत स्थानकाजवळ आली असता बोगीत काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरु केला. प्रवाशांचा आवाज ऐकून जया यांनी त्यांची बॅग आपल्याजवळ घेऊन बसल्या. याच दरम्यान चार ते पाच जण त्यांच्याजवळ आले. वस्तूने भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जया यांनी त्यांना प्रतिकार केला. एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एका सतर्क नागरीकाने १०० नंबरवरुन पोलिसांना फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या मेलमध्ये कार्यरत असलेले आरपीएफ जवानांनी त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले.
हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परिसरात राहणारे आहेत. तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. कल्याण रेल्वे न्यायालयाने या चार जणांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला आहे का याचा तपास सुरू आहे.
अर्चना दुसाने पोलीस निरीक्षक
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर