December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाचनालयाला पर्याय नाही : अरुण म्हात्रे

केडीएमसी व सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

कल्याण

जगाची चिंता करणारा माणूस म्हणजे लेखक, पुस्तकांच्या वाचनाने माणूस श्रीमंत होतो. इतिहास घडविणारे ठिकाण म्हणजेच वाचनालय, जिवंतपणाची खूण म्हणजे सार्वजनिक वाचनालय, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाचनालयाला पर्याय नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी येथे व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, बालरोग तज्ञ डॉ.संगीता गोडबोले, ज्येष्ठ कवी सुरेखा गावंडे उपस्थित होत्या.

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाचनालयाला पर्याय नाही : अरुण म्हात्रे

याप्रसंगी कुलकर्णी यांनी उपस्थितांना आव्हान केले कि, आपण आपल्या जवळपासच्या लोकांना वाचनालयाचे सभासदत्त्व घेण्यास प्रवृत्त करावे व वाचन संस्कृती वाढवण्यास सहकार्य करावे. तर सरचिटणीस बारस्कर म्हणाले, वाचनालयाचे अध्यक्ष हे वाचनालायचा आरसा असतात असा आरसा लोकांसमोर यायला हवा म्हणूनच आज या ठिकाणी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, श्री स्वामी समर्थ ग्रंथालय डोंबिवलीच्या अध्यक्षा माधुरी घाटे व ज्ञानेश्वर माउली ग्रंथालायचे अध्यक्ष तानाजी सहाणे यांचा प्रातिनिधिक स्वरुपात आम्ही सत्कार करत आहोत.

या कार्यक्रमास वाचक व स्पर्धक यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यासाठी आशा जोशी, नीलिमा नरेगलकर, विश्वस्त प्रशांत मुल्हेरकर, ग्रंथपाल गौरी देवळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रथसेविकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व सहाय्यक ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी केलेल्या सुंदर सूत्रसंचनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.