December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC Election : केडीएमसी निवडणुकांचे बिगुल वाजले

पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार निवडणुका

कल्याण

कमागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या केडीएमसीच्या निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे आज जाहीर करण्यात आले. केडीएमसी मुख्यालयात या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार आहेत. महापालिकेतील २७ गावापैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, प्रभाग रचना करताना या १८ गावांसह करण्यात आली आहे. यंदा ११ प्रभाग वाढल्याने १३३ प्रभाग असणार आहेत.