- पॅनल पद्धतीने होणार निवडणूक
- ४४ प्रभागापैकी ४३ प्रभाग त्रिस्तरीय.
- १३३ सदस्य सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार.
- ६७ जागा महिलांसाठी
- सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातीसाठी १३ जागा राखीव.
- अनुसूचित जातींच्या महीलांसाठी ०७ जागा.
- अनुसूचित जमातीसाठी ०४ जागा.
- अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ०२ जागा.
- सर्वसाधारण खुल्या जागा ११६ त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी.
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचने बाबत हरकती नोंदवण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी असून प्राप्त होणाऱ्या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी २६ फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केडीएमसीच्या आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेसाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. आतापर्यंत झालेली लोकसंख्येतील नैसर्गिक वाढही त्यात गृहीत धरण्यात आली आहे.
ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत. त्यापैकी ४३ प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी ६७ जागा महिलांसाठी आहेत. एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी १३ जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी ०७ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी ०४ जागा असून त्यापैकी ०२ जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा ११६ असून त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी राहणार आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर