April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ कोल्हापुरमध्ये झाला. ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. १९५६ साली रमेश देव यांनी ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. तर ‘आरती’ हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे.