वर्तकनगर पोलिसांची कामगिरी
ठाणे
फोन पे ॲपव्दारे देशातील विविध शहरातील ज्वेलरी शॉप व हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर (३३, रा. छत्तीसगड) याला ठाणे शहर पोलिसांच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याने विविध शहरातील १४ ज्वेलर्स व ३२ हॉटेल व्यावसायिकांची सुमारे २० लाख रूपयांची फसवणुक केल्याची कबुली दिल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.
अभिजीत मोरे (३४) यांचे फोन पे ॲपच्या माध्यमातुन फोन पेचे ट्रान्झॅक्शननुसार रक्कम न पाठविता फोन पेचे स्क्रीन शॉटमध्ये फेरफार करून ९७ हजार ३३० रुपये पेड केले आहेत असे भासवून ज्वेलरी खरेदी करण्यासाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुब्रम्हण्यम याच्याविरूध्द वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. २८ जानेवारीला २०२२ रोजी त्याला अटक केली असून वर्तकनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
असा करायचा गुन्हा
सुब्रम्हण्यम हा हॉटेलमध्ये अथवा ज्वेलरी खरेदी करण्यासाठी दुकांनामध्ये गेल्यानंतर तेथे हॉटेलच्या किंवा ज्वेलरी शॉपचे मालाची जेवढया रक्कमेचे पेमंट करावयाचे आहे. तो त्याच्या बँक अकाऊंट वरून फोन पे ॲपचा वापर करून मोबाईलवरून संबंधित हॉटेल किंवा ज्वेलरी शॉपच्या फोन पे सुविधा असलेल्या लिंकवर किंवा क्युआर कोडव्दारे पैसे ट्रान्फसर करत असे. परंतु, त्याच्या अकाऊंटवर बॅलन्स नसल्यामुळे ट्रान्झक्शन फेल असे दाखवत असे, तो मॅसेज तो तात्काळ संबंधित व्यावसायिकाला न दाखवता त्यानंतर तो त्याच्या फोन पे ॲपमधील स्वतःच्या बँक अकाऊंटवरून त्याच्याच दुसऱ्या बँक अकाऊंटला १ रू पाठवत असे व त्याचे ट्रान्झक्शन सक्सेसफूल असा मेसेज आल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका ॲपमध्ये जावून वरील फोन पे चे फेल व १ रू चे सक्सेसफुलच्या दोन्ही ट्रान्झेक्शनचे स्क्रिनशॉट त्या ॲपमध्ये घेवून ते दोन्ही एडीट करून त्याच्या फोन पे वरील ट्रान्झक्शन सक्सेसफुलचा वरील भाग हा हॉटेल किंवा ज्वेलरी शॉपच्या ट्रान्झक्शन फेलच्या स्क्रिनशॉटला अटॅच केल्यानंतर संबंधित हॉटेल किंवा ज्वेलरी शॉपच्या मालकांना बनावट तयार केलेला परंतु, ट्रान्झक्शन सक्सेसफुल असे दिसणारा स्क्रिनशॉट दाखवत असे व त्याद्वारे खरेदी करून फसवणूक करत होता. तसेच काही ठिकाणी व्यावसायिकांनी संशय व्यक्त केला असता तो गुगल वर जाऊन एका वेबसाईटच्या माध्यमातून त्याच्या बँकेच्या स्टेटमेंटची पीडीएफ फाईल घेवून त्यामधील पुर्वीच्या नमुद असलेल्या रक्कमेच्या ट्रान्झक्शन कट करून त्या ऐवजी ज्वेलरी खरेदीची रक्कम टाईप करून व फोन पे चे ट्रान्झक्शन यु.टी.आर. कोड टाकून त्याचे बँक अकाऊंटची डुप्लीकेट / एडीटेड स्टेटमेंट तयार करून तो त्याच्या बँकेच्या खात्यातुन सदरची रक्कम डेबिट झाल्याच्या स्क्रिनशॉट काढून ज्वेलरी शॉपमधील काम करणाऱ्या व्यक्तींना दाखवत असे.
याठिकाणी गुन्हे दाखल
सुब्रम्हण्यम याने देशातील विविध शहरातील १४ ज्वेलर्स व ३२ हॉटेल व्यावसायिकांची सुमारे २० लाख रूपयांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाणे, ना. म. जोशी पोलीस ठाणे, मुंबई व हैद्राबाद येथील पंजीगुट्टा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर