December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

जीएसटी चोरीप्रकरणी दाम्पत्याला अटक

ठाणे जीएसटीची कारवाई

ठाणे

ठाणे जीएसटी आयुक्तालय हद्दीत मुंबई झोनच्या अँटी एव्हिजन विंगच्या अधिकाऱ्यांनी एका दाम्पत्याला जीएसटी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्या दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे स्थित असलेली एम/एस डेटालिंक कन्सल्टन्सी ही कंपनी संशयास्पद संस्था म्हणून ओळखली गेली आणि फर्मविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली. ही फर्म विविध उच्चभ्रू कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असल्याचे तपासात समोर आले. फर्मने ग्राहकांकडून जीएसटी गोळा केला होता. परंतु, सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत जीएसटी जमा केला नव्हता. या फर्मचे दोन भागीदार, जे पती (५०) आणि पत्नी (४८) आहेत. त्या दाम्पत्याला ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम १३२ (डी) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. तसेच त्यांना ठाणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आल्यावर त्या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पाच महिन्यात सहा जणांना अटक; १७ कोटींची वसुली

सीजीएसटी, मुंबई झोनने कर चुकवेगिरी करणार्‍या आणि फसवणूक करणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या चोरीविरोधी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेदरम्यान गेल्या पाच महिन्यांत सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने १०२३ कोटींची करचोरी शोधून काढली. १७ कोटी वसूल करून ६ जणांना अटक केली.

येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत विभागाकडून ही चोरीविरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.

राजन चौधरी, सीजीएसटी आणि सीइएक्स ठाणे आयुक्त