ठाणे
नौपाडयातील रामकृष्ण जोशी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली असलेल्या ‘उमा निवास’ घरावर वाळलेले नारळाचे झाड पडल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत उमा निवासच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तातडीने झाड हटविण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह