December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवलीतील अथर्वने पटकावला ‘परफॉर्मर अवॉर्ड’

एसआयपी अँबॅकस अकॅडमी आयोजित ऑनलाइन एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा हि देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील अंकगणित स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत डोंबिवलीतील ‘होली एंजेल स्कूल’ मधील अथर्व अगंध दामोदरे याने 'परफॉर्मर अवॉर्ड’ पटकावला आहे.

ठाणे

एसआयपी अँबॅकस अकॅडमी आयोजित ऑनलाइन एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा ही देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील अंकगणित स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीत डोंबिवलीतील ‘होली एंजेल स्कूल’ मधील अथर्व अगंध दामोदरे याने ‘परफॉर्मर अवॉर्ड’ पटकावला आहे. या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. देशभरातील १०२५ शाळांमधील ९५ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेत इयत्ता दुसरी ते पाचवीमधील देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांची अंकगणित क्षमता सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. एसआयपीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर आणि मिसाईल वूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या संरक्षण मंत्रालयातील डीआरडीओच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस ऑनलाइन पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या स्पर्धा २०२१ मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बक्षीसे जिंकली. १५ लाखांहून अधिक रक्कमेचा बक्षीसे असलेली २५ हजाराहून अधिक बक्षीसे विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. तर २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी रोख पारितोषिके जिंकली आहे. ७५० विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली आणि २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पदके आणि प्रमाणपत्रे जिंकली. २ हजाराहून अधिक एसआयपी अबॅकस प्रशिक्षक आणि एसआयपी अबॅकस केंद्र प्रमुखांच्या सहभागाने हा मेगा इव्हेंट भारतभर आयोजित करण्यात आला. बक्षीस घोषणेच्या ऑनलाइन कार्यक्रमात राष्ट्रीय विजेते, पालक आणि एसआयपी टीम सदस्यांसह ३५० हून अधिक सहभागींनी हजेरी लावली होती.

डीआरडीओच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस म्हणाल्या की, आपल्या सर्वांकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. जेव्हा तुम्ही प्रशिक्षण आणि चाचणीद्वारे सराव करता तेव्हा बुद्धिमत्ता गुणांक वाढेल”. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी आणि विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच हा अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल एसआयपीचे कौतुक केले.

एसआयपीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर म्हणाले की, एसआयपी अंकगणित जीनियस स्पर्धा दरवर्षी शाळा आणि मुलांसाठी विनामूल्य आयोजित करते कारण पालक आणि मुलांना अंकगणितात रस घेण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. अबॅकस प्रोग्रामद्वारे मुलांना त्यांची अंकगणित क्षमता सुधारण्यास मदत केली जाऊ शकते.